परराज्यातून ऊस आणण्यास मनाई ; उसाचा भाव कारखाने ठरवतील : पाटील (30-09-2010 : 12:37:42) | ||
मुंबई, दि. २९ (विशेष प्रतिनिधी) : राज्यात यंदा ८२५ लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून, परराज्यातून ऊस आणण्यास मनाई करण्यात आली आहे. १२० सहकारी आणि ३८ खासगी कारखान्यांमध्ये ९५ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित असल्याचे पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. साखर कारखाने उसाला क्ंवटलमागे २२०० रुपये भाव देत नाही, तोवर ऊस न देण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे. तथापि, एफआरपी कायद्यानुसार केंद्राने ठरवून दिलेल्या भावापेक्षा किती जादा भाव द्यायचा, याचा निर्णय घेण्याची त्या-त्या कारखान्याला मुभा असल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्यातील ४४ साखर कारखान्यांना शासनाने ४०० कोटी रुपयांची हमी दिली आहे. राज्य शासनाकडून प्रथमच तूरखरेदी राज्यात येत्या १५ दिवसांत तुरीची खरेदी ३ हजार ५०० रुपये क्ंवटल भावाने सुरू करण्यात येईल, असे पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यंदा राज्यात १३ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. केंद्र सरकारने तुरीला ३ हजार रुपयांचा आधारभूत भाव दिला आहे. त्यात सुरुवातीचे दोन महिने क्ंवटलमागे ५०० रुपये लाभांश देण्यात येणार आहे. |
Thursday, September 30, 2010
परराज्यातून ऊस आणण्यास मनाई ; उसाचा भाव कारखाने ठरवतील : पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment